ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात 14,492 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 297 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 6 लाख 61 हजार 942 वर पोहचली आहे.
शनिवारी दिवसभरात 9 हजार 241 रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत 4 लाख 80 हजार 114 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 1 लाख 69 हजार 516 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 71.45 % आहे. तर मृत्यू दर 3.27 % आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 35 लाख 66 हजार 288 नमुन्यांपैकी 6 लाख 61 हजार 942 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 12 लाख 11 हजार 608 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 35 हजार 371 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.