ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात 14,492 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 326 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 6 लाख 43 हजार 289 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 21 हजार 359 एवढा आहे.
गुरुवारी दिवसभरात 12 हजार 243 रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत 4 लाख 59 हजार 124 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 1 लाख 62 हजार 491 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 71.37 % आहे. तर मृत्यू दर 3.32 % आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 34 लाख 14 हजार 809 नमुन्यांपैकी 6 लाख 43 हजार 289 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 11 लाख 76 हजार 261 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 37 हजार 639 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.