ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढतच आहे. मागील 24 तासात आता पर्यंतचे सर्वाधिक म्हणजेच 23,816 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 325 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 9 लाख 67 हजार 349 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 27 हजार 787 एवढा आहे. त्यामुळे राज्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
बुधवारी दिवसभरात 13,906 रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्यात आतापर्यंत 6 लाख 86 हजार 462 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 2 लाख 52 हजार 734 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 70.96 % आहे. तर मृत्यू दर 2.87 % इतका आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 48 लाख 83 हजार 006 नमुन्यांपैकी 9 लाख 67 हजार 349 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 16 लाख 11 हजार 220 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 37 हजार 644 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- पुण्यात 2 लाखांपेक्षा अधिक रुग्ण
देशात पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. ही संख्या 2 लाख 12 हजार 563 वर पोहोचली असून आता पर्यंत 4,584 जणांनी आपला जीव गमावला आहे. सद्य स्थितीत 65,361 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1 लाख 42 हजार 618 जणांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. बुधवारी पुण्यात 1,573 आणि पुणे मनपा क्षेत्रात 2,340 रुग्णांची नोंद झाली.