ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात 1576 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 29 हजारांपार गेली आहे. राज्यात आतापर्यंत 29 हजार 100 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर कालच्या दिवसात 505 रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आता पर्यंत 6564 रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले
शुक्रवारी राज्यात 49 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण संख्या 1068 वर पोहचली आहे आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईत 34, अकोल्यात 2, पुण्यात 6, पनवेल आणि डोंबिवलीमध्ये 2, धुळ्यात 2, पनवेल, जळगाव आणि औरंगाबाद मध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. काल दिवसभरात 512 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. काल झालेल्या मृत्यूंमध्ये 29 पुरूष आणि 20 महिलांचा समावेश आहे.
दरम्यान, मुंबई महापालिकेतील एकूण रुग्णांची संख्या 17 हजार 671 इतकी झाली असून मुंबईतील एकूण बळींची संख्या 655 इतकी आहे.