ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात 583 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर 27 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील रुग्णसंख्या आता 10 हजार 498 वर पोहचली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरवरून याबाबातची माहिती दिली आहे.
महाराष्ट्रात मागील 24 तासात बरे झालेल्या 180 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 1773 रुग्ण बरे झाले आहेत. त्यांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत 1 लाख 45 हजार 798 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 1 लाख 34 हजार 244 जणांचे नमुने निगेटिव्ह आले. तर 10 हजार 498 जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 68 हजार 266 लोक होम क्वारंटाइन असून 10 हजार 695 लोक हे संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.