ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील चोवीस तासात सर्वाधिक म्हणजेच 6330 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 86 हजार 626 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
– 1 लाख 1 हजार 172 रुग्ण कोरोनामुक्त !
पुढे ते म्हणाले, त्यातच दिलासादायक बाब म्हणजे गुरुवारी एका दिवसात आतापर्यंतचे सर्वाधिक 8018 जणांनी कोरोनावर मात केली. यामध्ये मुंबईतील 7033, पुण्यात 477, नाशिक 332, औरंगाबाद 93, कोल्हापूर 12, लातूर 7, अकोला 31 तर नागपूरमधील 33 जणांचा समावेश आहे. त्यामुळे आतापर्यंत 1 लाख 1 हजार 172 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
गेल्या 24 तासात राज्यात 125 मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा 8 हजार 178 वर पोहोचला आहे. सध्या राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 54.21 टक्के असून मृत्यूचे प्रमाण 4.38 इतके आहे. सद्यस्थितीत राज्यात 77 हजार 260 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, राज्यात आतापर्यंत प्रयोगशळेत पाठवण्यात आलेल्या 10 लाख 20 हजार 368 नमुन्यांपैकी 1 लाख 86 हजार 626 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 72 हजार 32 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 41 हजार 741 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.