ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात 24,619 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 398 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 11 लाख 45 हजार 840 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 31 हजार 351 एवढा आहे. त्यामुळे राज्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
गुरुवारी दिवसभरात 19, 522 रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत 8 लाख 12 हजार 354 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 3 लाख 01 हजार 752 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 70.90 % आहे. तर मृत्यू दर 2.74 % आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 56 लाख 04 हजार 890 नमुन्यांपैकी 11 लाख 45 हजार 840 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 17 लाख 70 हजार 748 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 36 हजार 827 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- शहरे ॲक्टिव्ह रुग्ण संख्या
- मुंबई : 32,959
- ठाणे : 29,323
- पुणे : 81,540
- नाशिक : 12,869
- नागपूर : 21,273