ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मंगळवारी 2701 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 13 हजार 445 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
पुढे ते म्हणाले, त्यातच दिलासादायक बाब म्हणजे मागील चोवीस तासात 1802 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले. तर एकूण 57 हजार 851 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सध्या 50 हजार 44 रुग्ण उपचार घेत आहेत. काल दिवसभरात 81 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. याशिवाय मुंबईतील 862 आणि उर्वरित राज्यातील 466 अशा एकूण 1328 जुन्या मृत्यूंची नोंद घेण्यात आली. त्यामुळे मृतांची एकूण संख्या पाच हजारच्या पुढे गेला आहे.
सध्या राज्यात 5 लाख 86 हजार 686 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 27 हजार 242 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.