ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात 2,752 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 45 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 20 लाख 09 हजार 106 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 50 हजार 785 एवढा आहे. E
कालच्या एका दिवसात 1,743 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 19 लाख 12 हजार 264 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य स्थितीत राज्यात 44 हजार 831 रुग्ण उपचार घेत आहेत.
- मुंबईत 479 नवे रुग्ण
मुंबईत कालच्या दिवसात 479 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 503 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3,06,040 वर पोहचली आहे. तर 2,87,515 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कालच्या एका दिवसात 07 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर मृतांची एकूण संख्या 11,300 इतकी आहे. सद्य स्थितीत 6,328 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.