ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात सोमवारी 3721 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 49.86 टक्के एवढा आहे. त्यामुळे राज्यात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 35 हजार 796 अशी झाली आहे. कालच्या दिवसात 1962 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत एकूण 67 हजार 706 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात 61 हजार 793 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
पुढे ते म्हणाले, कालच्या दिवसात नोंदवण्यात आलेल्या एकूण 113 मृत्यूंपैकी 62 मृत्यू हे मागील चोवीस तासातील असून 51 हे आधीच्या काळातील आहेत. त्यामुळे आतापर्यंत 6283 कोरोनाबाधित रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.
आजपर्यंत 7 लाख 87 हजार 419 नमुने प्रयोगशाळांत पाठवण्यात आले असून त्यातील 1 लाख 35 हजार 796 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 1 हजार 182 जण होम क्वारंटाइन तर 26 हजार 910 जण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.