- रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.48 %
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात 4,132 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 127 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 17 लाख 40 हजार 461 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 45 हजार 809 एवढा आहे.
गुरूवारी दिवसभरात 4,543 रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत 16 लाख 09 हजार 607 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 84 हजार 082 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 92.48 % आहे. तर मृत्यू दर 2.63 % आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 97 लाख 22 हजार 961 नमुन्यांपैकी 17 लाख 40 हजार 461 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 08 लाख 10 हजार 267 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 6 हजार 177 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.