ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात 4,268 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 87 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 18 लाख 72 हजार 440 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 48 हजार 059 एवढा आहे.
कालच्या एका दिवसात 2,774 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 17 लाख 49 हजार 973 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य स्थितीत राज्यात 73 हजार 315 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 93.46 % आहे. मृत्यू दर 2.57 % आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 1 कोटी 15 लाख 70 हजार 137 नमुन्यांपैकी 18 लाख 72 हजार 440 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात लोक होम 5 लाख 32 हजार 288 क्वारंटाईनमध्ये असून, 5 हजार 122 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.