- 1 लाख 25 हजार 109 ॲक्टिव्ह रुग्ण
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात 5,369 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 113 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 16 लाख 83 हजार 775 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 44 हजार 024 एवढा आहे.
रविवारी दिवसभरात 3,726 रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत 15 लाख 14 हजार 079 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 1 लाख 25 हजार 109 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 89.92% आहे. तर मृत्यू दर 2.61 % आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 90 लाख 24 हजार 871 नमुन्यांपैकी 16 लाख 83 हजार 775 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 25 लाख 44 हजार 799 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 12 हजार 230 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.