ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात 5,753 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 50 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 17 लाख 80 हजार 208 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 46 हजार 623 एवढा आहे.
कालच्या एका दिवसात 4,060 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 16 लाख 51 हजार 064 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 92.75 % आहे. मृत्यू दर 2.62 % आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 1 कोटी 02 लाख 13 हजार 026 नमुन्यांपैकी 17 लाख 80 हजार 208 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 05 लाख 15 हजार 976 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 5 हजार 615 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- मुंबईत रविवारी 1135 नवे रुग्ण
मुंबईत काल दिवसभरात 1135 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 19 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 2,75,707 इतकी झाली आहे. काल दिवसभरात 618 रुग्णांना घरी सोडण्यात आले. तर आतापर्यंत 02 लाख 52 हजार 127 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या मुंबईत 9,770 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर मृतांची संख्या 10,673 पोहोचली आहे.