ऑनलाईन टीम / मुंबई :
आजपासून (दि.२८) पुढील चार दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीटीसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
विदर्भात आज (दि.२८) काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
तर २९ एप्रिलला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट होईल. कोकण आणि गोव्यातही वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
३० एप्रिलला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. १ मे रोजी मध्य महाराष्ट्रासह कोकण विभागात विजांच्या कडकडाटात पाऊस होण्याची शक्यता आहे.