ऑनलाईन टीम / पुणे :
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील पुरंदरमध्ये मंगळवारी संध्याकाळी 7 वाजून 28 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले.
मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता 2.6 रिश्टल स्केल एवढी होती. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे. लोकांना भूकंपाची जाणीव होताच लोक घरातून बाहेर पडले.
तर दुसरीकडे लडाखमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 3.6 रिश्टल स्केल एवढी होती. हा भूकंप बुधवारी पहाटे 12 वाजून 48 मिनिटांनी झाला.