ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक विभागांतर्गत विविध 56 संवर्गाच्या 17 हजार पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
टोपे म्हणाले, ग्रामविकास विभागातील आरोग्य विभागाशी संबंधित दहा हजार आणि सार्वजनिक आरोग्य विभागातील 7 हजार अशा एकूण 17 हजार पदांची भरती केली जाणार आहे. यापैकी पन्नास टक्के जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध होईल.
‘क’ आणि ‘ड’ वर्गांच्या पदांसाठी ही भरती असेल. यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत परीक्षा घेतली जाईल. ही परीक्षा ‘आयटी कंपनी’ घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले सांगितले.