ऑनलाईन टीम / मुंबई :
ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेसचे नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली.
ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, माझी कोरोना चाचणी आज पॉझिटिव्ह आली आहे. अजून काही दिवसापासून माझ्या संपर्कात असलेल्या लोकांना मी आवाहन करतो की, त्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव आपली देखील कोरोना चाचणी करून घ्यावी. तसेच प्रत्येकाने आपली काळजी घ्यावी आणि सुरक्षित राहावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तेे घरामध्येच क्वारंटाइन झाले आहेत.
दरम्यान, यापूर्वी नितीन राऊत यांच्या मुंबई कार्यालयातील 10 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.