ऑनलाईन टीम / मुंबई :
शिवसेना नेते आणि राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
मला कोरोनाची लागण झाली असून संपर्कात आलेल्या सगळ्यांनी काळजी घ्यावी असा सल्ला दादा भुसे यांनी दिला आहे. तर सध्या त्यांची प्रकृती ठीक असून लवकरच ते बरे होऊन कामावर रुजू होतील असेही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, राज्य सरकारमधील राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना पहिल्यांदा कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर राज्याचे उपुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. या सर्वांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली.