मुंबई
संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री केंद्र व राज्य सरकारद्वारे गेले 15 दिवस आपणास विविध सूचना करत आहेत. त्यानुसार आपण सर्व जण स्वतःची, आपल्या परिवाराची, आपल्या आसपासच्या लोकांची किंबहुना एकप्रकारे राज्याची व देशाची काळजी घेत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी या कठिण परिस्थितीस तोंड देण्यासाठी सर्वानी सढळ हस्ते मुख्यमंत्री सहाय्यक निधीस आर्थिक सहाय्य करावे असे आवाहन केले आहे. यानुसार महाराष्ट्र कॅरम असोसिएशनतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रुपये 1,11,111/- मदत देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.