बेंगळूर : केरळ, महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱयांना कोविड चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सादर करण्याची सक्ती करण्यात आलेली आहे. मात्र, कोणालाही कर्नाटक प्रवेशावर निर्बंध घालण्यात आलेले नाही, असे स्पष्टीकरण आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिले. केरळ आणि महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून या राज्यांमधून येणाऱयांना आरटीपीसीआर चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. याबाबत मार्गसूची जारी करण्यात आली आहे. परंतु, या राज्यांमधील प्रवाशांना कर्नाटक प्रवेशावर निर्बंध घालण्यात आलेले नाही, असे त्यांनी सांगितले आहे.
Previous Articleदिल्लीत 200 नवीन कोरोनाबाधित; 2 मृत्यू
Next Article शुल्क कपात : उच्च न्यायालयाची राज्य सरकारला नोटीस
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.