मातीसाठी किरण भगत तर मॅटसाठी दिग्विजय जाधव
प्रतिनिधी/ सातारा
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने जिल्हा तालीम संघातर्फे 64 व्या वरिष्ठ स्तर गादी व माती राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी लढतीसाठी झालेल्या जिल्हा निवड चाचणी स्पर्धेत महाराष्ट्र केसरी लढतीसाठी माती विभागातून मोही (ता. माण) चा किरण भगत तर मॅट विभागासाठी रेठरे खुर्द (ता. कराड)च्या दिग्विजय जाधव यांची निवड झाली. हे दोघेही सातारा जिल्हय़ाचे नेतृत्व करणार आहेत.
साताऱयातील तालीम संघाच्या मैदानावर शनिवारपासून सुरु असलेल्या राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती व महाराष्ट्र केसरी लढतीसाठी निवड चाचणी स्पर्धेत जिल्हय़ातील गादी व माती कुस्ती प्रकारात 57 किलो, 61 किलो, 70 किलो, 74 किलो, 86 किलो, 92 किलो, 97 किलो व महाराष्ट्र केसरी गटासाठी 86 ते 125 किलो वजनगटातील पैलवानांनी सहभाग नोंदवला होता. दोन दिवस तालीम संघाच्या मैदानावर कुस्तीशौकिनांनी या लढतींचा थरार अनुभवता आला.
जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष साहेबराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धेसाठी पंच म्हणून नितीन शिंदे, तानाजी केसरे, महालिंग खांडेकर, अमर देशमुख, जराप्पा लोणार, अमर कणसे, प्रल्हाद जाधव, रमेश थोरात, युवराज पवार, हिंदूराव लोखंडे, जितेंद्र कणसे यांनी काम पाहिले.
या स्पर्धेत माती विभागात 57 किलो वजनगटात तेजस मुगुटराव गोफणे प्रथम, गणेश तात्याबा ढोले द्वितीय, 61 किलो वजनगटात सूरज सुखदेव गावडे प्रथम, पृथ्वीराज संजय वाडकर द्वितीय, 65 किलो वजनगटात अजय संभाजी मदने प्रथम, सूरज पोपट शिरतोडे द्वितीय तर 70 किलो वजनगटात सागर लालासो सूळ प्रथम, सयाजी बापू मदने द्वितीय, 74 किलो वजनगटात महेश वसंत कुंभार प्रथम, सूरज लक्ष्मण भोसले द्वितीय, 79 किलो वजनगटात धनाजी नामदेव रुपनवर प्रथम तर किरण बापूराव बरकडे द्वितीय, 86 किलो वजनगटात रणजित शांताराम राजमाने प्रथम, सागर ज्ञानदेव गायकवाड द्वितीय, 92 किलो वजनगटात अक्षय संभाजी मोहिते प्रथम तर अलसमीद रफीक इनामदार द्वितीय, 97 किलो वजनगटात गणेश अपुंश कुकुले प्रथम तर प्रशांत रामदास शिंदे याने द्वितीय क्रमांक पटकावल्याने त्यांची राज्यस्तरीय अजिंक्य कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली.
या स्पर्धेत मॅट विभागात 57 किलो वजनगटात विकास रामचंद्र पिसाळ प्रथम, करण रमेश किर्दत द्वितीय, 61 किलो वजनगटात विशाल लालासो सूळ प्रथम, सुजल मिलिंद कांबळे द्वितीय, 65 किलो वजनगटात प्रदीप रामचंद्र सूळ प्रथम, प्रथमेश दादा पाटील द्वितीय तर 70 किलो वजनगटात प्रणय रविंद्र चव्हाण प्रथम, संदेश देणश शिपकुले द्वितीय, 74 किलो वजनगटात आकाश सत्यवान माने प्रथम, निखिल संभाजी जमाले द्वितीय, 79 किलो वजनगटात विशाल नवनाथ कोकरे प्रथम तर साहील संजय पाटील द्वितीय, 86 किलो वजनगटात विशाल बलभीम राजगे प्रथम, अनिकेत कृष्ण सावंत द्वितीय, 92 किलो वजनगटात अजय अविनाश थोरात प्रथम तर विनायक दिलीप दिडवाघ द्वितीय, 97 किलो वजनगटात तुषार खाशाबा ठोंबरे प्रथम तर शुभम शहाजी मांडवे याने द्वितीय क्रमांक पटकावल्याने त्यांची राज्यस्तरीय अजिंक्य कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली.
महाराष्ट्र केसरीसाठी यांच्या निवडी
महाराष्ट्र केसरी लढतीसाठी झालेल्या चाचणीत माती विभागात मोही, ता. माणच्या किरण नारायण भगत याने प्रथम क्रमांक तर मॅट विभागात रेठरेखुर्द, ता. कराडच्या दिग्विजय दिलीप जाधव याने प्रथम क्रमांक पटकावला. तर वेदराज मिलिंद बाजारे व अमोल गंगाराम साळुंखे यांनी द्वितीय क्रमांक पटकावले असून राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत भगत व जाधव हे सातारा जिल्हय़ाचे नेतृत्व करणार आहेत.