- तर 11 लाख पेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त!
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांनी 14 लाखांचा टप्पा पार केला आहे. मागील 24 तासात राज्यात 16, 476 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 394 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 14 लाख 00 हजार 922 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 37 हजार 056 एवढा आहे. त्यामुळे राज्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
गुरुवारी दिवसभरात 16,104 रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत 11 लाख 04 हजार 426 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 2 लाख 59 हजार 006 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 78.84 % आहे. तर मृत्यू दर 2.65 % आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 68 लाख 75 हजार 451 नमुन्यांपैकी 14 लाख 00 हजार 922 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 21 लाख 74 हजार 651 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 28 हजार 720 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.