- कोरोना रुग्णांच्या मृत्यूदरात घट
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात 3,423 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 19 लाख 58 हजार 971 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 95.73 % आहे.
दरम्यान, मागील 24 तासात राज्यात 2,216 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 20 लाख 46 हजार 287 वर पोहचली आहे. सध्या 34 हजार 720 रुग्ण उपचार घेत आहेत. दिवसभरात 15 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर मृतांचा एकूण आकडा 51 हजार 325 एवढा आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.52 % आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 1 कोटी 50 लाख 10 हजार 037 नमुन्यांपैकी 20 लाख 46 हजार 287 (13.63 %) रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 67 हजार 764 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 1 हजार 976 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.