- शुक्रवारी 9,798 नवे रुग्ण; 14,347 डिस्चार्ज
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा ग्राफ उतरता असून कालही नवीन बाधितांच्या तुलनेत कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आली आहे. मागील 24 तासात 14 हजार 347 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर 9,798 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे.
दरम्यान, कालच्या दिवशी 198 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 59 लाख 54 हजार 508 वर पोहचली आहे. यातील 56 लाख 99 हजार 983 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मृतांचा एकूण आकडा 1 लाख 16 हजार 674 एवढा आहे. महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.73 % आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.96 % इतके आहे.
- मुंबईत 18,764 रुग्णांवर उपचार सुरू
सद्य स्थितीत राज्यात 1 लाख 34 हजार 747 रुग्ण उपचार घेत आहेत. या मधील 18 हजार 764 हे मुंबईतील आहे. तर ठाणे जिल्ह्यात 13,970, पुण्यात 17,888, कोल्हापूरमध्ये 11,453, सांगलीत 10,545, नागपूरमध्ये 8, 329 आणि सिंधुदुर्गमधील 5, 372 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.