मुंबई
सध्या कोरोना जगभरात धुमाकूळ घालत असून या विषाणूने
वंश, जात, पात, पंथ, वर्ण, धर्म, देश यांच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. भारतात सुद्धा
कोरोनाने सर्वांना सळो की पळो करून सोडण्यास सुरवात करण्यापूर्वीच आपल्या सरकारने त्यावर
योग्य असे उपाय करण्यास सुरवात केली आहे. या पार्श्वभूमीवर समाजातील विविध संस्था,
व्यक्ती कोरोना विरोधात लढण्यासाठी आर्थिक मदत जाहीर करत आहेत. या सर्व गोष्टींचे भान
ठेवून महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, भारतीय खो खो
महासंघाचे सहसचिव चंद्रजीत जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, सरचिटणीस ऍड. गोविंद शर्मा,
खजिनदार
ऍड.
अरुण देशमुख यांनी महाराष्ट्र खो खो असोसिएशनकडून कोरोना विषाणू संसर्गाविरोधात लढण्यासाठी
मुख्यमंत्री सहाय्यता निधीला रु. 1,11,111/- देण्याचे जाहीर केले आहे. हा धनादेश लवकरच
खो-खोचे प्रेरणास्थान असलेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे देणार असल्याचे
सरचिटणीस ऍड. गोविंद शर्मा यांनी सांगितले.