ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत आहे. त्यातच मागील 24 तासात 533 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली तर 3 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर आतापर्यंत एकूण 17 हजार 972 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आढळलेल्या 17,972 कोरोनाबाधित पोलिसांमधील 14, 269 पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
सद्यस्थितीत राज्यात 3523 कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 180 पोलिसांनी आपला जीव गमावला आहे.