कुपवाड / प्रतिनिधी
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँन्ड अँग्रीकल्चर मुंबईच्या “गव्हनिंग कौन्सिल” या पदावर कुपवाड औद्योगिक वसाहतमधील कृष्णाव्हॅली चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अँन्ड कॉमर्सचे माजी व्हाईस चेअरमन व विद्यमान संचालक रमेश आरवाडे यांची नुकतीच फेरनिवड करण्यात आली आहे.
सदर निवडीचे पत्र केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते देण्यात आले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँन्ड अँग्रीकल्चर मुंबईचे अध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष उमेश दशरथी, रविंद्र मागणावे, सचिव सागर नगारे व सर्व पदाधिकाऱ्यांनी सन २०२१ – २०२४ या तीन वर्षासाठी पश्चिम महाराष्ट्रातून रमेश आरवाडे यांची गव्हनिंग कौन्सिल पदी फेरनिवड केली आहे.
आरवाडे यांचे ज्ञान, अनुभव आणि कौशल्य याचा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सला नक्कीच फायदा होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून व्यापार, उद्योग, सेवा क्षेत्रात भेडसावणाऱ्या समस्यांचे केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून निराकरण करुन सर्व क्षेत्रातील संस्था व संघटनांना उभारी देण्याचे कार्य करण्यात येईल. त्यांच्या निवडीबद्दल कृष्णाव्हॅली चेंबरचे सर्व पदाधिकारी व उद्योजकांनी त्यांचे स्वागत करून अभिनंदन केले आहे.