ऑनलाईन टीम / मुंबई :
मागील तीन महिने राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कामगारांना वेतन मिळालेले नाही. दिवाळी सारखा मोठा सण तोंडावर येऊन ठेपल्या असतानाही सरकार दखल घेत नाही, म्हणून महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने आज राज्यभरात आक्रोश आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात सर्व कर्मचारी आपल्या कुटुंबासह सहभागी होणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात सातारा रस्त्यावरून एस टी कॉलनी येथे आंदोलन होणार असून या आंदोलनात संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे आणि अध्यक्ष सचिन शिंदे उपस्थित राहणार आहेत. तीन महिन्याचे थकीत वेतन तातडीने देण्यात यावेत ही या कामगारांची मुख्य मागणी आहे.
राज्यातील एक लाख 10 हजार कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. वेतन अभावी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची होणारी अस्वस्थता विचारात घेता दिवाळीपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचे थकीत वेतन, थकित महागाई भत्ता आणि दिवाळी सण उचल न मिळाल्यास एसटी प्रशासनाविरोधात संघटनेमार्फत मुंबई येथील औद्योगिक न्यायालयात दाखल दाखल केला जाईल तसेच इंटक संघटने कडून देखील दिवाळीच्या पहिल्या दिवशी कामबंद आंदोलन केले जाणार आहे.