सांगली / प्रतिनिधी
सांगली व मिरज शहरात 11 एप्रिल 2021 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोग – महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा-2020 एकूण 51 हायस्कूल / महाविद्यालयाच्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. परिक्षा केंद्राच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी परिक्षा केंद्राच्या ठिकाणी इमारतीपासून 100 मीटरच्या सभोवतालच्या परिसरात दि. 11 एप्रिल 2021 रोजीचे सकाळी 8 ते दुपारी 2 पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू केले आहे.
वरील वेळेत दोन किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना फिरण्यास मनाई केली आहे. एकत्रित गटागटाने फिरणे व उभे राहण्यास मनाई केली आहे. तसेच परिक्षा केंद्राच्या परिसरातील झेरॉक्स मशिन, टेलिफोन बुथ, फॅक्स मशीन, ध्वनीक्षेपक यांचा परिक्षा संदर्भात कोणत्याही गैरप्रकारासाठी वापरण्यास मनाई केली आहे. तसेच परिक्षा केंद्रात मोबाईल, पेजर नेण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही.