ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्र आणि दसरा सण देखील साधेपणाने साजरा करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले आहे. याबाबत परीपत्रकही काढण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
पुढे तेे म्हणाले, गणपती उत्सवादरम्यान ज्या प्रकारे सहकार्य केले त्याच प्रकारेच नवरात्र, दसरा देखील सर्वांनी साधेपणाने करून सहकार्य करावे, जेणेकरुन कोरोनाचा प्रसार थांबविता येईल.
लोकांनी गर्दी न करता गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवही साधेपणाने साजरा करावा. कोरोनासंदर्भातील शासनाने जारी केलेल्या सूचना, मार्गदर्शक तत्वे यांचे काटेकोरपणे पालन करावे. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन, स्वच्छता या सर्व बाबींची काळजी घ्यावी, जेणेकरुन आपण सर्वजण सर्वांच्या सहभागातून कोरोनाचा प्रसार रोखू शकू, असेही मुख्यमंत्री म्हटले आहे.
पुढे ते म्हणाले, गणपती उत्सव साजरा करण्याबाबत जसे परिपत्रक शासनाने काढले होते त्याचप्रमाणे या सणाबाबत देखील लवकरच मार्गदर्शक परिपत्रक काढण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.