करवे आंदोलकांकडून हिरेबागेवाडी येथे प्रकार : पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाववर आपला हक्क दाखविण्यासाठी आलेल्या करवे आंदोलकांना हिरेबागेवाडी येथे अडविण्यात आले. रोखण्यात आल्याने काही माथेफिरूंनी बेळगावहून हुबळीच्या दिशेने जाणाऱया वाहनांना आपले लक्ष्य केले. काही वाहनांच्या काचा फोडण्याचा प्रयत्न झाला. परंतु पोलिसांनी त्यांना वेळीच रोखले. तरीदेखील वाहनांच्या नंबर प्लेट, वायफर तसेच मराठी अक्षरांना काळे फासण्याचा प्रयत्न करण्यात आला.
बेंगळूर येथून आलेल्या काही माथेफिरूंनी हिरेबागेवाडी टोलनाक्मयानजीक धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला. दिसेल ते महाराष्ट्र पासिंगचे वाहन अडविण्यात येत होते. मालवाहू वाहनांसह कुटुंबासमवेत जाणाऱया वाहनांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे वाहनचालकांमधून संतप्त प्रतिक्रिया क्यक्त केली जात होती. वाहनांवर चढून त्यांचे नुकसान करण्याचा प्रयत्न झाला. परंतु पोलिसांनी तो हाणून पाडला. सर्व आंदोलकांना वाहनांमधून भरून इतरत्र सोडण्यात आले. यामुळे पोलिसांनी हे आंदोलन टोलनाक्मयानजीकच चिरडले.
कडेकोट बंदोबस्त…
करवेचे कार्यकर्ते बेळगावपर्यंत पोहचू नयेत, यासाठी पोलिसांनी सोमवारी सकाळपासूनच हिरेबागेवाडी टोलनाक्मयानजीक फौजफाटा तैनात केला होता. पोलिसांसह राखीव सुरक्षा दलाचे जवान महामार्गावर बंदोबस्तासाठी ठेवण्यात आले होते. दीडशेहून अधिक पोलीस या बंदोबस्तासाठी लावण्यात आले होते. पोलिसांनी आंदोलकांना रोखून त्यांना वाहनांमध्ये भरून इतरत्र सोडले.