तरुण भारत संवाद प्रतिनिधी / अक्कलकोट
केंद्र सरकारने लागू केलेल्या सीएए, एनआरसी कायदया विरोधात वंचित बहुजन आघाडीकडून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला अक्कलकोटमध्ये शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. या बंद दरम्यान अक्कलकोट शहरातील बाजारपेठ पूर्णपणे बंद होती. तसेच अक्कलकोट आगारातील सर्व बस बंद असल्याने ग्रामीण भागातील एसटीची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली होती. या बंदला विविध संघटनांनी जोरदार पाठिंबा दिल्याने हा बंद शंभर टक्के यशस्वी झाला. ग्रामीण भागातही बंद पाळण्यात आला.
अक्कलकोट येथे वंचित बहुजन आघाडीकडून याचे नेतृत्व करण्यात आले होते. यामध्ये सर्व संघटना, संस्था, मुस्लिम समाज बांधव यांनी जाहीर पाठिंबा देऊन बंदचे आवाहन केले होते. शुक्रवारी सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवत बंदमध्ये सहभाग नोंदविला. सकाळी ११ वाजता ए- वन चौक येथील क्रांती स्तंभापसून मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा फत्तेसिंह चौक, मेन रोड, कापड बाजार, कारंजा चौक, विजय कामगार चौक मार्गे बस स्टँड जवळील श्री मल्लिकार्जुन देवालयाच्या प्रांगणात जाहीर सभेने समारोप करण्यात आला.
यावेळी पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकरच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. सीएए व एनआरसी कायदा कसा घातक आहे याबद्दल विविध नेते, सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यानी मार्गदर्शन केले. या प्रसंगी वंचित आघाडीचे तालुका अध्यक्ष चंद्रशेखर मंडिखांबे, भारतीय लहुजी सेना जिल्हा अध्यक्ष वसंत देडे, शिव बसव डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामजिक संस्थेचे अध्यक्ष संदीप मडिखांबे, भीम प्रकाश सामजिक संस्थेचे अध्यक्ष शिलामनी बनसोडे, मराठा सेवा संघाचे माजी अध्यक्ष राम जाधव, मातंग समाजचे अध्यक्ष सुनील खवळे, अक्कलकोट मुस्लिम समाज अध्यक्ष एजाज मुतवली, जिल्हा उपाध्यक्ष देवानंद अस्वले जिल्हा उपाध्यक्ष यलपा घटकंबळे, नगरसेवक सद्दाम शेरीकर, एमआयएम तालुकाध्यक्ष फारुख मुजावर, सलिम यळसंगी, इसाक पटेल, मौलाना मेहताब साब, मौलाना इरफान अत्तारी साब, रजाक सय्यद, अंबरनाथचे वंचित आघाडीचे नेते बी.बी. मडिखांबे, सिद्धार्थ बनसोडे, रवि पोटे, परशुराम भगळे, शहर अध्यक्ष आनंद मोरे ,महासचिव राहुल मोरे, महासचिव शहर चनु शिंगे, महासचिव नितीन शिवशरण, तालुका संघटक बबन गायकवाड , बालाजी शिवशरण ,श्याम बनसोडे ,तालुका उपाध्यक्ष नरसिंह गायकवाड, गौतम गायकवाड, प्रदीप बनसोडे आदिसह कार्यकर्ते , नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अक्कलकोट तालुक्यातील वागदरी, शिरवळ, चपळगाव, मैंदर्गी, दुधनी आदींसह विविध गावांमध्ये बंद पाळण्यात आला.