ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 191 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत 22 हजार 460 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 311 पोलिसांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत आढळलेल्या एकूण 22,460 कोरोनाबाधित पोलिसांपैकी आतापर्यंत 19 हजार 022 पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
- 3,199 पोलिसांवर उपचार सुरू
सद्यस्थितीत राज्यात 3199 कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 239 पोलिसांनी आपला जीव गमावला आहे.