ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात तब्बल 62 हजार 194 कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले. तर 63 हजार 842 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज दिला. दरम्यान, राज्यात आजपर्यंत एकूण 42,27,940 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.54% इतके आहे.
बुधवारी महाराष्ट्रात 853 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत कोरोनामुळे 73 हजार 515 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. दरम्यान, सद्य स्थितीत राज्यातील मत्यूदर 1.49% एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,86,61,668 प्रयोगशाळा नमुन्याांपैकी 49,42,736 (17.25 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 38,26,089 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 29,406 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- मुंबई : 3, 838 जणांना डिस्चार्ज!
मुंबईत मागील 24 तासात तब्बल 3,838 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर 3,056 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर आता पर्यंत 6,02,383 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सद्य स्थितीत 50,606 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.