ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 69 पोलिसांना कोरोनाची लागण झाली. तर आतापर्यंत 26 हजार 057 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आतापर्यंत 274 पोलिसांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आढळलेल्या 26,057 कोरोनाबाधित पोलिसांमध्ये 2844 पोलीस अधिकारी आणि 23,213 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत 24 हजार 053 पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 2607 पोलीस अधिकारी आणि 21,446 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सद्यस्थितीत राज्यात 1730 कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये 211 पोलीस अधिकारी आणि 1519 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 274 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 26 पोलीस ऑफिसर आणि 248 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे