प्रतिनिधी/ सातारा
महाराष्ट्र रग्बी असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या सब ज्युनिअर 14 वर्षे वयोगटातील आंतरजिल्हा राज्यस्तरीय रग्बी चषक स्पर्धा या चंद्रपूर येथे दि. 26 ते 27 फेब्रुवारी रोजी पार पडल्या. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील सर्व जिह्यांचा सहभाग होता. स्पर्धेतूनच सातारा जिल्हा संघातून मुलांमध्ये अर्णव किरण पाटेकर आणि मुलींमध्ये प्रेरणा प्रदीप डांगरे व दीपिका रीचपाल रिन्हवा या खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड झाली.
पुढील सब ज्युनिअर 14 वर्षे वयोगटातील राष्ट्रीय रग्बी स्पर्धा या सिकंदराबाद (हैदराबाद) येथे दि. 5 ते 6 मार्च रोजी पार पडलेल्या या स्पर्धेत मुलींच्या महाराष्ट्र संघाने तिसरा क्रमांक पटकावत कास्य पदक मिळवले.
सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच सातारा जिल्हा रग्बी असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष वीरभद्र कावडे, उपाध्यक्ष मनोज चव्हाण, सचिव अलंकार पवार यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या खेळाडूंना प्रशिक्षक म्हणून अंकुश जांभळे, अजिंक्य जांभळे, दिपराज राजेभोसले, श्रीधर जाधव, आरती दुदुस्कर, दिव्या पवार यांचे मार्गदर्शन लाभले.