ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन करतो. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल.
दरम्यान, राज्य सरकारमधील राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना पहिल्यांदा कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर राज्याचे उपुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. या सर्वांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली.