चंद्रपूर : प्रतिनिधी
घोडाझरी वन्यजीव अभयारण्याअंतर्गत येणाऱ्या नागभीड वनपरिक्षेत्रात वाघांच्या लढतीत एका वाघाचा दुसऱ्या वाघाशी लढताना मृत्यू झाला. T-11 या वाघिणीचा मृतदेह सोमवारी सकाळी वन परिक्षेत्रातील हुमा बीटमध्ये आढळून आला. नागभीड रेंजच्या गस्ती पथकाला कंपार्टमेंट क्रमांक ५८२ मध्ये मृत वाघ दिसला.
घटनास्थळी दाखल झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या वाघिणीची ओळख T-11 अशी केली ज्यीचा या प्रदेश परिसरात वावर होता. शरीरावर अनेक जखमा पाहिल्यानंतर, 13 वर्षीय श्वापद दुसर्या बलाढ्य वाघाशी झालेल्या लढाईत मरण पावला असल्याचा निष्कर्ष वनअधिकार्यांनी काढला.
NTCA आणि PCCF प्रतिनिधींच्या उपस्थितीत पशुधन विकास अधिकारी डॉ. गिरीश गभणे आणि डॉ. शिरीष रामटेके यांच्या पथकाने घटनास्थळी शवविच्छेदन केले. शवविच्छेदनात गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाल्याची पुष्टी झाली. डीसीएफ दीपेश मल्होत्रा, एसीएफ, आरएम वाकडे आणि आरएफओ महेश गायकवाड यांच्या उपस्थितीत वाघाचे अवशेष घटनास्थळी जाळण्यात आले.