ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यातच आता राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली.
त्या आपल्या ट्विट मध्ये म्हणाल्या की, नमस्कार, आज माझ्या तपासणीदरम्यान मला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम यांमुळे मी बरी आहे. कृपया माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी नियम आणि अटींप्रमाणे कोरोना चाचणी करून घ्यावी. तसेच सर्वांनी सुरक्षित राहा आणि काळजी घ्या, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, यापूर्वी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, जलसंपदा मंत्री बच्चू कडू यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे.