ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या ‘रेमडेसिवीर’च्या 10 हजार इंजेक्शनची खरेदी बांग्लादेशकडून करण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरद्वारे याबाबतची माहिती दिली.
‘महाराष्ट्र सरकार कोरोनावर परिणामकारक ठरणाऱ्या’रेमडेसिवीर’च्या 10 हजार इंजेक्शनची खरेदी करणार आहे. प्रयोगशाळा, प्राणी आणि क्लिनिकल अभ्यासाच्या पुराव्यांच्या आधारे MERS- CoV आणि SARS मध्ये यास आशादायक परिणाम मिळाला आहे, जोदेखील कोरोना व्हायरसमुळे होतो, असे टोपे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
‘रेमडेसिवीर’चे कोरोना उपचारात सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. हे औषध महाग असल्याने हे गरीब रुग्णांनाही उपलब्ध व्हावे या हेतूने ठाकरे सरकारने बांग्लादेशकडून 10 हजार इंजेक्शन मागवली आहेत.