प्रतिनिधी/ येळ्ळूर
येळ्ळूर येथील समाज शिक्षण संस्था संचालित महाराष्ट्र हायस्कूलचा सलग 14 वर्षे दहावीचा निकाल 100 टक्के लागला. याबद्दल बेळगाव तालुका गटशिक्षणाधिकारी आर. पी. जुट्टण्णावर यांच्या हस्ते रोख 25 हजार व स्मृतिचिन्ह देऊन या हायस्कूलचा गौरव करण्यात आला. मुख्याध्यापक बबन कानशिडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
कर्नाटक परीक्षा मंडळाच्यावतीने आतापर्यंत चारवेळा दहा हजार रुपये, दोनवेळा पाच हजार रुपये तर यावषी 25 हजार रुपये या शाळेने पटकाविले आहेत. बेळगाव तालुक्मयात एक आदर्श शाळा म्हणून या शाळेकडे पाहिले जाते. दरवषी 100 टक्के निकाल लागत आहे. त्याबद्दल अभिनंदन होत आहे. महाराष्ट्र हायस्कूलने एक शिस्तबद्ध शाळा, याचबरोबर शिक्षणासह खेळामध्येही वेगळे स्थान निर्माण केले आहे.
या शाळेचे अनेक विद्यार्थी क्रीडाक्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहेत. याचबरोबर विविध क्षेत्रांमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी गरुडझेप घेतली आहे. मुख्याध्यापक बी. पी. कानशिडे, गणित शिक्षक ए. एच. हुंदरे, इंग्रजी शिक्षक जे. पी. धामणेकर, विज्ञान शिक्षक एस. पी. ताशिलदार, मराठी शिक्षक के. बी. पोटे, कन्नड शिक्षक पी. बी. मिराशी, क्रीडा शिक्षक वाय. सी. गोरल, कला शिक्षक एल. एफ. बस्तवाडकर यांनी विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत.
शाळेत प्रवेशासाठी नेहमीच चढाओढ
शाळेची प्रगती पाहून केवळ येळ्ळूरच नाही तर इतर गावांतील आणि शहरातील विद्यार्थी-पालक या शाळेमध्ये प्रवेशासाठी चढाओढ करत आहेत. मात्र सरकारी नियमानुसार जी पटसंख्या आहे, त्या पटसंख्येनुसारच विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन आजपर्यंत शिक्षण देण्याचे काम या शाळेने केले आहे. शिक्षकांबरोबरच शाळेतील कर्मचारी पी. एन. मेणसे, आर. एम. मुरकुटे, के. वाय. पाटील, एन. बी. दळवी हे देखील विद्यार्थ्यांकडे जातीने लक्ष देत असतात. संस्थेच्या अध्यक्षा लीलाताई मेणसे तसेच इतर संचालकांचे नेहमीच शिक्षकांना प्रोत्साहन लाभले आहे.