ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 263 पोलिसांना कोरोनाची लागण झाली. तर 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 21 हजार 574 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आतापर्यंत 222 पोलिसांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आढळलेल्या 21,574 कोरोनाबाधित पोलिसांमध्ये 2342 पोलीस अधिकारी आणि 19,232 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत 17 हजार 797 पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 1877 पोलीस अधिकारी आणि 15,920 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सद्यस्थितीत राज्यात 3548 कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये 442 पोलीस अधिकारी आणि 3106 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 229 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 23 पोलीस ऑफिसर आणि 206 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.