ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात 3,729 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 72 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 19 लाख 58 हजार 282 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 49 हजार 897 एवढा आहे.
कालच्या एका दिवसात 3,350 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 18 लाख 56 हजार 109 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य स्थितीत राज्यात 51 हजार 111 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 94.78 % आहे. मृत्यू दर 2.55 % आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 1 कोटी 31 लाख 99 हजार 201 नमुन्यांपैकी 19 लाख 58 हजार 282 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात लोक होम 2 लाख 70 हजार 217 क्वारंटाईनमध्ये असून, 2 हजार 824 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- मुंबईत गुरुवारी 665 नवे रुग्ण; 379 जणांना डिस्चार्ज!
मुंबईत काल दिवसभरात 665 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 07 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 2,96,984 इतकी झाली आहे. काल दिवसभरात 379 रुग्णांना घरी सोडण्यात आले. तर आतापर्यंत 02 लाख 77 हजार 192 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या मुंबईत 7,756 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर मृतांची संख्या 11,162 पोहोचली आहे.