बजरंग दल व श्रीराम सेना हिंदुस्थानच्या दोन रुग्णवाहिका सेवेत
वार्ताहर/ खानापूर
खानापुरात श्री महालक्ष्मी सांसर्गिक रोग व आपत्ती निवारण समितीच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या कोविंड केअर सेंटरमध्ये काम करणाऱया डॉक्टर्स, परिचारिका तसेच सेवेकरींच्या सुरक्षिततेसाठी जि.पं. माजी सदस्य जोतिबा रेमाणी यांनी 50 पीपीई किट देऊन मदतीचा हात पुढे केला आहे. सदर किट शुक्रवारी सेंटरचे अध्यक्ष किरण यळ्ळूरकर, उपाध्यक्ष पंडित ओगले, कार्यदर्शी सदानंद पाटील त्यांच्याकडे सुपूर्द केले.
यावेळी जि.पं. माजी सदस्य जोतिबा रेमाणी यांनी सद्यपरिस्थितीत संक्रमणाने अनेकांवर संकट ओढवले आहे. अनेक सेवेकरी आपल्या जिवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. सेवेकरी, डॉक्टर, परिचारिका यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. शिवाय महालक्ष्मी कोविड केअर सेंटर सुरू केल्याने तालुक्मयातील पॉझिटिव्ह रुग्णांच्या उपचारासाठी लाभ होत असून प्रत्येकाने आपली काळजी घेत सामाजिक अंतर व सुरक्षितता राखून कोरोना महामारीला हरविण्यासाठी प्रयत्न करूया, असे सांगून या कोविड सेंटरसाठी आवश्यकतेनुसार आणखी पीपीई किट देण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांच्या समवेत प्रकाश गावडे, सर्वज्ञ कपिलेश्वरी, अजित पाटील, बजरंग दलचे अध्यक्ष नंदकुमार निटूरकर यासह महालक्ष्मी केअर सेंटरचे पदाधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक उपस्थित होते.
या कोविड केअर सेंटरला खानापुरातील सामाजिक कार्यकर्ते तसेच ऍडव्होकेट एच. एन. देसाई यांचे चिरंजीव अभिलाष देसाई यांनी दहा हजार रुपये मदत स्वरुपात सेंटरचे अध्यक्ष व पदाधिकाऱयांकडे सुपूर्द केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
विश्व हिंदू परिषद-बजरंग दल तसेच श्रीराम सेना हिंदुस्थानच्या दोन रुग्णवाहिका सेवेत
तालुक्मयात कोरोना संक्रमणाने पीडित रुग्णांच्या सेवेसाठी तालुक्मयातील विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तसेच श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी सेवेत झोकून दिले आहे. पीडित रुग्णांच्या सेवेसाठी तालुका बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गेल्या आठवडाभरापासून मोठे काम हाती घेतले आहे. केवळ अडचणांच्या ठिकाणी अंत्यसंस्कारच नव्हे तर रुग्णांना वेळेत जवळच्या दवाखान्यात अथवा कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यासाठीही प्रयत्न हाती घेतले आहेत. यासाठी तालुका बजरंग दल अध्यक्ष नंदकुमार निटूरकर यांच्या नेतृत्वाखाली खानापूर शहर प्रमुख अमोल परवी, कार्यकर्ते संघटनेच्या तत्वांना अंगीकृत करत कधीच भाषा भेद, जाती भेद किंवा धर्म भेद न करता कार्य करत आहेत. या कामी शहर प्रमुख अमोल परवी, अनिकेत गावडे, अर्जुन राजपूत, प्रदीप देसाई, सुहास गुळेकर, पंकज देसाई, गौरव पाटील, आकाश अथणीकर, नागराज खानापूरकर, कुणाल पवार, शिवराज होसूर, भारत हरिजन, सुहास गुलेकर, पंकज देसाई, गौरव पाटील, अमोल पत्री, निलेश आळवणी, भारत फाटके, अभिजित पाटील आदी कार्यकर्ते काम करत आहेत.
श्रीराम सेना हिंदुस्थान खानापूर
गेल्या दोन दिवसात खानापूर तालुका श्रीराम सेना हिंदुस्थानचे कार्यकर्तेही या कामामध्ये अहोरात्र झटत आहेत.श्रीराम सेना हिदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्याकडून खानापूर तालुक्मयासाठी Aस्ंल्त्aहम ची सेवा केली आहे. सदर रुग्णवाहिकेसाठी खानापूर तालुका संघटना अध्यक्ष पुंडलिक महाराज मो. 9380990693, अनंत जुंजवाडकर-9980706732, मंजू गोंधळी 9071806482, आदित्य कलाल 9731470994, संजू गुरव 9746879761, गणेश गोंधळी 9731312004, नारायण तिरवीर 9591922611 या क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. या दोन्ही संघटनांनी रुग्णवाहिका महालक्ष्मी कोविड केअर सेंटरमध्ये सेवेत दाखल केल्या आहेत.