प्रतिनिधी/ मडगाव
वेर्णा जुने म्हार्दोळ येथील श्री महालसा नारायणी देवालय आणि अनुषंगिक पंचायतर्फे श्रींचा नौकाविहार (सांगोड) व दीपोत्सव कार्यक्रम कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे साधेपणाने साजरा करण्यात आला. भक्तांच्या हितासाठी देवालयाच्या समितीने बैठकीत विचार विनिमय करून उत्सव अगदी साधेपणान संपन्न करण्याचे ठरवल्या प्रमाणे कमित कमी भाविकांच्या उपस्थितीत सामाजिक अंतर ठेवून साजरा करण्यात आला. सकाळी श्रींचा अभिषेक, दूपारी आरती, संध्या. 6:30 वा नौकाविहार व? दिपोत्सव व 7:30 वा. महाआरती असा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी संस्कार भारती वेर्णातर्फे रांगोळी काढण्यात? आली होती.