प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरातील थिबा पॅलेस रोड येथे महावितरणच्या कर्मचाऱयाला मारहाण करणाऱया दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी संजय शिवाजी खोपकर (44,़ थिबा पॅलेजस रोड रत्नागिरी) व निशांत प्रमोद चाळके (24, संगमेश्वर ) यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
महावितरणचे कर्मचारी शंकर शिवाजी राठोड यांनी मारहाण प्रकरणी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली होत़ी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संजय खोपकर यांचे थिबा पॅलेस रोड येथे चंद्रशेखर दुध डेअरी नावाचे दुकान आह़े या डेअरीचे 1 लाख 23 हजार व घराचे 28 हजार 863 रूपयाचे वीजबिल थकित होत़े महावितरणचे कर्मचारी शंकर राठोड रविवारी 11 वाजता नोटीस घेवून खोपकर यांच्या थिबा पॅलेस रस्त्यावरील घरी गेले होत़े यावेळी राठोड यांनी खोपकर यांना नोटीस दिल़ी
नोटीस दिल्याचा राग आल्याने खोपकर यांनी राठोड यांना आपल्या खोलीमध्ये बोलावून घेतल़े यावेळी खोपकर व त्यांच्या सोबत असलेल्या कर्मचाऱयाने राठोड यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली तसेच बंदुकीचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार राठोड यांनी दाखल केली होती. मारहाणीत जखमी झालेल्या राठोड यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होत़े