1 जुलैपासून कॉलेजमध्ये लसीकरण अभियान
प्रतिनिधी /बेंगळूर
कोरोना संसर्गापासून रक्षण होण्यासाठी 18 वर्षांवरील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कॉलेजमध्ये 1 जुलैपासून लसीकरण अभियान सुरू करण्यात येत आहे. राज्यातील सर्व खासगी, अनुदानित व सरकारी प्रथमशेणी महाविद्यालये, पॉलिटेक्निक आणि इंजिनियरिंग कॉलेजमध्ये लसीकरण अभियानाला प्रारंभ होत असून यासंबंधी शिक्षण खात्याने मार्गसूची जारी केली आहे.
महाविद्यालयीन शिक्षण खात्याचे सर्व प्रादेशिक संचालक आणि तांत्रिक शिक्षण खात्याचे संचालक, जिल्हाधिकाऱयांच्या सहकार्याने सर्व सरकारी, अनुदानित, सरकारी महाविद्यालये, पॉलिटेक्निक आणि इंजिनियरिंग कॉलेजच्या प्राचार्यांनी आपापल्या महाविद्यालयांमध्ये लसीकरण अभियानासाठी नोडल अधिकारी म्हणून काम पहावे, असे मार्गसूचीत नमूद करण्यात आले आहे.
कॉलेजमध्ये लसीकरणासाठी आरोग्य अधिकाऱयांशी समन्वय राखून सहकार्य करावे. कॉलेजमधील विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचाऱयांना लसीसाठी तारीख आणि वेळ यांची माहिती व्हॉट्स ऍप, मेसेज, फोन, पत्र व इतर माध्यमातून द्यावी. या सर्वांचे लसीकरण नियोजनाप्रमाणे होईल, याकडे लक्ष द्यावे. लसीकरणासंबंधीची माहिती शिक्षण संचालकांना द्यावी, अशी सूचना मार्गसूचीद्वारे प्राचार्यांना देण्यात आली आहे.
विद्यार्थी, प्राध्यापकांचे लसीकरण झाल्यानंतरच राज्यातील पदवी महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.