सातारा / प्रतिनिधी :
शासनाच्यावतीने घरकुल योजनेचा लाभ तळागाळापर्यंत मिळावा याकरता चांगले काम करणाऱ्या जिल्हा परिषदा, ग्रामपंचायत, तालुका यांना पुरस्कार देवून आणखी चांगले काम कसे करता येईल, याकरता महा आवास अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानात सातारा जिल्हा परिषदेस प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये तृतीय तर राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये सातारा जिल्हा द्वितीय आणि सर्वोत्कृष्ट तालुक्यामध्ये पाटण तालुका पंतप्रधान आवास ग्रामीणमध्ये द्वितीय तर राज्य पुरस्कृतमध्ये पाटण तृतीय, तसेच सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीमध्ये प्रधानमंत्री आवासमध्ये पाटण प्रथम, शासकीय जागा उपलब्धता व वाळू उपलब्धतामध्ये सर्वात्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांमध्ये पाटण द्वितीय मानकरी ठरला.
या पुरस्काराचे वितरण दि. 30 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय विधानभवन, पुणे येथे दुपारी 12 वाजता पार पडणार आहे.