नवी दिल्ली
पुण्यातील चाकण येथील कारखान्यामध्ये बनलेली महिंद्राची नवी एक्सयुव्ही 700 ही कार ऑक्टोबरमध्ये बाजारात दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबतची माहिती नुकतीच कंपनीने दिली आहे. सदरची गाडी ही अनेकविध सुरक्षा साधनांसह येणार आहे. सायफाय टेक्नॉलॉजीवर आधारीत ही गाडी पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंधनाच्या पर्यायासह बाजारात उपलब्ध केली जाणार आहे. मॅन्युअल आणि ऑटोमॅटीक ट्रान्स्मीशनचा पर्याय गाडीत असणार आहे. याच वर्षी ही गाडी ऑक्टोबरमध्ये ग्राहकांसाठी विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.